Saturday, 9 February 2019

*डॉ. प्रेम जग्यासी लिखित “कार्व युअर लाईफ” ह्या पुस्तकाचे अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या हस्ते अनावरण.*


*डॉ. प्रेम जग्यासी लिखितकार्व युअर लाईफह्या पुस्तकाचे अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या हस्ते अनावरण.*


कार्व युअर लाईफ: लिव ग्रेट लाईफ विथ कार्विझम”; एक असं पुस्तक जे लोकांच्या सशक्तीकरणाशी जोडलेलं, लोकांना स्वत्वाची जाणीव करून देणारं आहे. जीवनाचा खरा अर्थ समजावणारं आहे आणि यशस्वीपणे जगण्याचा मार्ग सांगते. ह्या पुस्तकाचे प्रकाश हे टाईम्स ग्रुप बुक ह्यांनी केले आहे आणि ह्याचे अनावरण फिल्म टीवीमधून प्रसिद्धीस आलेल्या भाग्यश्री ह्यांनी केले.   

कार्व युअर लाईफहे पुस्तक, डॉ. प्रेम जग्यासी ह्यांच्या द्वारे प्रचलीत कार्विझमच्या सिद्धांतानां प्रतीत करते. ह्यांनी त्या सिद्धांतांनासेल्फ कार्विंग क्वालिटीज” , “शेप युअर माइंड”  आणि फाईंड युअर passion” ह्यांच्या सहाय्याने समजावले आहे. लेखकाच्या मते, आपलं जीवन अनावश्यक गोष्टींना मिळवण्याच्या नादात, त्याच्या ओझ्याखाली दाबून गेलंय. ज्यामुळे आपण जीवनाला खऱ्या अर्थाने समजू ही शकत नाही आहोत आणि ना त्या जीवनाला उलगडू पाहत आहोत. जर आपण ते करण्याइतके सक्षम झालो तर आपल्याला ह्या जीवन जगण्याचा खरा हेतू समजून येईल आणि ह्या जीवनाला सुख समाधानाने जगू शकू. अश्यात सुखी जीवनाचा एकमात्र उपाय म्हणजे जीवनाला मिळालेली नक्काशी.


लेखक, डॉ. प्रेम जग्यासी विश्व स्तरावरचे प्रख्यात नेते जीवन प्रशिक्षक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत कैक महत्वाची व्याख्याने दिली आहेत आणि कैक अजून बऱ्याच देशांमध्ये महत्वपूर्ण मुद्द्यांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन त्यांनी केले आहे. ते ही सानुकुलितेने. ते कार्व युअर लाईफ ह्या प्रशिक्षण योजनेसाठी खूप प्रचलित आहेत. ह्या पुस्तकात त्यांनी मिनिमिलीझम म्हणजेच गैर-भौतिकतावाद, उत्पादकता आणि स्वतःहात बदल करण्यासाठीच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत

हे पुस्तक लिहिण्याच्या प्रेरणेबाबत बोलताना डॉ. प्रेम जग्यासी सांगतात, “कमीत कमी भौतिक गोष्टींचा वापर करत, स्वताहात बदल घडवण्यासाठी, आपले आयुष्य भरपूर जगण्याची कला हीच सर्वात उत्तम प्रक्रिया आहे. माझे हे पुस्तक त्या सगळ्यांसाठी एखाद्या सर्वेसर्वा सारखे कामास येईल, ज्याला आपल्या आयुष्याचे मूल्य जाणून घ्यावयाचे आहे आणि जीवन जगण्याचे सर्वश्रेष्ठ प्रकार जगावयाचे आहे.” 

ह्या पुस्तकाला अभिनेत्री भाग्यश्री ह्यांनी लॉच केले. त्या एक आशय अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या अटींनुसार आपले आयुष्य जगतात. इतकंच नाही तर त्या समाज आणि चित्रपटसृष्टीसाठीचे आपले उत्तरदायित्वासाठी खूप सजग आहेत आणि दोन्ही गोष्टींत त्यांचे बरोबरीचे योगदान देत आल्या आहेत.

लेखकाच्या मते, भाग्यश्री एक अशी व्यक्ती आहेत ज्या खऱ्या अर्थाने कर्विझमच्या हिशोबाने आपले आयुष्य जगल्या आहेत. आणि ह्याच कारणाने त्यांचं व्यक्तिमत्व ह्या पुस्तकाच्या अनावरणासाठी अगदी उपयुक्त आहे.

पुस्तकाची स्तुती करताना भाग्याशी म्हणाल्या, “बरेचदा आपण यशस्वीतेची तर्कहीन परिभाषा गढतो. खूप काही कमावण्यापेक्षा जास्त जीवनात होणाऱ्या आपल्या योगदानाला रेखांकित करणे गरजेचे आहे. ज्यात तुम्हाला आनंद वाटतो ते सर्व केले पाहिजे, आपल्या विचारांच्या मागे हात धुवून लागले पाहिजे आणि आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. प्रेम जग्यासी ह्यांच्या पुस्तकात कर्विझम सिद्धांताच्या सहाय्याने जीवनातल्या अनावश्यक गोष्टींना मिटवण्यासाठी, पुर्णत्वाचा अनुभव देणारी आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठीच्या संबंधित चांगली उदाहरणे सापडतील”. 

हल्लीच्या दशकात व्यावहारिकतेवर आधारित, सामाजिक आणि जीवनाला प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची मागणी बरीच वाढली आहे. “कार्व युअर लाईफत्या कमतरतेला भरून काढणारी, लोकांना आयुष्याचा खरा अर्थ समजावणारे आणि जीवनाला सुखी बनवणारे भौतिक अभौतिक पैलूंवर प्रकाश टाकण्याचा उमदा प्रयत्न करणारे पुस्तक आहे.

ह्या पुस्तकाचे संपादन आणि वितरणटाईम्स ग्रुप बुक्स (टीजीबी) ह्यांनी केले आहे. टीजीबीच्या सिनियर संपादिकामधुलिता मोहंतीह्यांनी ह्या पुस्तकाबद्दल बोलताना सांगितले  “आम्ही ह्याकार्व युअर लाईफपुस्तकाच्या प्रकाशनाला घेऊन प्रचंड आनंदी आहोत. आम्हाला खात्री आहे कि, डॉ. प्रेम जग्यासी द्वारे विकसित केली गेलेले हे कार्विझमचे तत्वज्ञान वाचून वाचकांना खूप लाभ होणार आहे कारण, ह्यात आपल्या क्षमतेस पुरेपूर उपयोगी असण्याचा प्रभावी मंत्र शामिल आहे


No comments:

Post a Comment